बेळगाव : बेळगाव महापालिका आयुक्तांनी आज शहरातील विविध भागांना अचानक भेट देत महांतेशनगर परिसरातील स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी महांतेशनगरमधील निवासी भागात फिरून रस्ते स्वच्छता, गटार सफाई तसेच कचरा व्यवस्थापनाची स्थिती तपासली. कामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी नियमित स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
या पाहणीवेळी नगरसेवक राजशेखर डोणी तसेच महापालिकेचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी परिसरातील समस्या आणि सुरू असलेल्या कामांची माहिती आयुक्तांना दिली.








