बेळगाव / प्रतिनिधी

मागील वर्षी ९ डिसेंबर २०२४ रोजी बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाविरोधात म. ए. समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता. पण महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आल्याने समिती नेते व कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात महामेळावा सभा घेण्याचे घोषित केले. त्यावेळी पोलिसांनी अटकाव व दडपशाही करून त्यांना अटक केली. आकसापोटी खडेबाजार पोलीस ठाण्याचे एएसआय व्ही.चिनास्वामी यांच्या फिर्यादीनुसार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, रामचंद्र मोदगेकर,आबासाहेब दळवी, गोपाळ देसाई, राजू किणेकर, शंकर कोनेरी, गोपाळ पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जेएमएफसी तृतीय न्यायालयात पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. संशयितांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, बाळासाहेब कागणकर, एम.बी.बोन्द्रे, रिचमन रिकी, वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.