बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये राजेश लोहार यांनी २०२१ मध्ये सुरू केलेले चित्रपट निर्मितीगृह, अस्मिता क्रिएशन्स अतिशय कमी वेळात यशाची शिढी चढत आहे. अस्मिता क्रिएशन्सचा पुढील मराठी चित्रपट अन्विता येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपट लेखक व दिग्दर्शक संतोष सुतार यांनी पत्रकारांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अस्मिता क्रिएशन्सने आता हिंदी चित्रपट क्षेत्रातही प्रवेश केला आहे अस्मिता मोशन पिक्चर्स या बॅनरखाली लिटल स्ट्रायकर्स या नांवाने हिंदी चित्रपट बनवणारी संस्था असेल.
अस्मिता मोशन पिक्चर्स या बॅनरची नोंदणी करण्यात आली आहे. अस्मिता मोशन पिक्चर्स बॕनरखाली राजेंद्र जैन आणि राजेश लोहार दोघेही या संस्थेत एकत्र काम करतील. आज अस्मिता मोशन पिक्चर्सच्या पहिल्या लिटल स्ट्रायकर्स पोस्टरचे अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या व मराठी चित्रपट निर्मात्या वीणा लोकूर व उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंकरराव सुगते त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी सह-निर्माते राजेश लोहार, धारवाडचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धलिंगा अक्की, कलाकार शशिकांत नाईक, निधी राऊळ, कर्नाटक बॉडी बिल्डींग असोसिएशन व स्पोर्ट्सचे सचीव व बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन व स्पोर्ट्सचे कार्याध्यक्ष अनिल आमरोळे, प्रकाश कालकुंद्रीकर, पवन हसबे, सोनाली मंजळकर,अतीत बेलेकर, सागर संभाजी, तुलसी प्रोडक्शनचे संस्थापक रतन मुचंडीकर आदी उपस्थित होते. चित्रपटासाठी ऑडिशन लवकरच जाहीर करण्यात येत आहे.
लिटल स्ट्रायकर्स ही कथा आजच्या शिक्षण व्यवस्थेत घडणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकते, ज्या गोष्टींबद्दल आजपर्यंत कोणीही खोलवर विचार केलेला नाही. प्रत्येकाला अभ्यास करण्याचा अधिकार आहे. पण काही मजबुरींमुळे मनात अभ्यास करण्याची इच्छा असूनही, काही लोक अभ्यास करू शकत नाहीत. लिटल स्ट्रायकर्स चित्रपट अभ्यासादरम्यान येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकेल असे चित्रपटाचे निर्माते राजेंद्र जैन यांनी सांगितले. या चित्रपटाची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेची संकल्पना चित्रपटाचे निर्माते राजेंद्र चंदुलाल जैन यांनी मांडली आहे.
शिक्षित होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु समाजामध्ये असलेल्या श्रीमंत व गरीब या भेदभावामुळे गुणी आणि होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हा चित्रपट अशाच काही शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकतो. या चित्रपटाचे येत्या 19 व 20 जुलै रोजी ऑडिशन ठेवण्यात येणार आहे तरी बेळगाव मधील चित्रपट कलाकारांनी नोंद घ्यावी. या चित्रपटाची कथा संतोष चंद्रकांत सुतार यांनी लिहिली आहे ते या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत.