उचगाव / वार्ताहर
उचगाव येथील प्रतिष्ठित नागरिक ह. भ. प. लक्ष्मण विठ्ठल पावशे (वय 87) यांचे सोमवार दिनांक 30 जून रोजी रात्री वृद्धापकालाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कर्ते चिरंजीव ,दोन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. एल आय. सी विमा प्रतिनिधी पुंडलिक पावशे यांचे ते वडील होत. अंत्यसंस्कार मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी उचगाव वैकुंठधाम येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.