खानापूर / प्रतिनिधी
खानापूर – यल्लापुर मार्गावरील बिडी नजीक झुंजवाड वळणावर धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सोमवारी सायंकाळी घडली. अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका-जिल्हा धारवाड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून अपघातात ठार झालेल्या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आला आहे. नंदगड पोलीस स्थानकाचे पीएसआय एस. एस. बदामी व हवालदार पांडू तुरमुरी व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.