सुळगा (हिं.) : ब्रह्मलिंग गल्ली येथील रहिवासी कु. परशराम यल्लाप्पा कलखांबकर (वय ३२) यांचे मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व वहिनी असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज दुपारी २.३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. कु. परशराम हे सुळगा (उ.) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. यल्लाप्पा कलखांबकर तसेच माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ. निर्मला कलखांबकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते.








