- अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातीत अंबडगट्टी क्रॉसजवळ आज सकाळी भरधाव धावणाऱ्या एका खाजगी बसला ट्रकने मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः ट्रक उलटला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ एस. एस. ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. बंगळुरूहून बेळगावच्या दिशेने येत असलेल्या बसता ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेमुळे ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी कित्तूर पोलिसांनी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने बस चालकाला वाचवते. ही घटना कित्तूर पोलीस ठाण्याजवळ घडली आहे.