कावळेवाडी : येथील श्री ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे ज्ञानेश्वर पारायण सोहळा संत तुकाराम बीज दिवशी आयोजित करण्यात आला आहे.या ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचा मूहूर्त मेढ कार्यक्रम सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्ताने बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, उपाध्यक्ष महेश पाटील, संतोष कांबळे, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, पुंडलिक जाधव, निंगाप्पा जाधव, बबनराव जाधव, महात्मा गांधी संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक, तालुका पंचायत समिती माजी अध्यक्ष यल्लापा बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पारायण सोहळ्याचे हे सलग सत्तावीस वर्षे चालू असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पारायण मंडळातर्फे करण्यात आले आहे.