कावळेवाडी : येथील श्री दुर्गामाता मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो.हे सलग तेरावे वर्ष हा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाची मूहूर्तमेढ गावातील धाकलू ओऊळकर यांच्या हस्ते उभारण्यात आली याप्रसंगी सांप्रदायिक भजनी मंडळ, तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.