- चोरीच्या ४८ तासांत दोन आरोपींना अटक
- २१ लाखांचे दागिने जप्त ; घरफोडीचा छडा
बेळगाव : कटकोळ पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. महिला वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या घरातून चोरीस गेलेले सुमारे २१ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
रामदुर्ग तालुक्यातील होसकोटे येथील रहिवासी व वसतिगृह अधीक्षक दिलशाद नदाफ यांच्या घरी ५ मे रोजी घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी कटकोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान मुदलगी तालुक्यातील कमलदिन्नी येथील हनमनाथ यल्लाप्पा मरापुर (वय २७) आणि हसीना अप्पासाब नदाफ (वय २४) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून सुमारे १५४.६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४५ ग्रॅम चांदी तसेच अन्य साहित्य असा एकूण २१ लाख १३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सीपीआय विनायक बडीगेर, पीएसआय बसवराज कोन्नूर आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.








