कंग्राळी खुर्द / वार्ताहर

कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील सुमारे ३६ युवकांनी सर्वांचं भलं व्हावं या उद्देशाने एकत्र येऊन नुकतीच तिरुपती बालाजी यात्रा पूर्ण केली. तत्पूर्वी बुधवार दि. ९ जुलै रोजी रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द येथून यात्रेला प्रारंभ केल्यानंतर दि. १० जुलै रोजी ते तिरुपती येथे पोहोचले. यानंतर चार तासात १४ किमी अंतर पार करताना ३५५० पायऱ्या चढून त्यांनी त्रिदर्शन घेतले. दर्शनासाठी सुमारे १४ तासांचा कालावधी लागला.

कोल्हापूर येथील आध्यात्मिक ऊर्जा भाविकांसाठी दिव्य प्रदक्षिणा पूर्ण करते, म्हूणन तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेणे अध्यात्मिक दृष्ट्या फलदायी मानले जाते. त्यामुळे परतीच्या प्रवासात दि. १३ जुलै रोजी सदर युवकांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचेही दर्शन घेतले, पुढे रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द गावात पोहोचल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

या यात्रेत अमर काटे, अमर, राहुल, नागेश, तेजस, बसू , विशाल, भावकन्ना, अशोक, परशुराम, चंद्रकांत, किरण, प्रशांत, प्रदीप, रुतुराज, प्रवीण, उद्धव, योगेश, चैतन्य, विजयकुमार, गजानन, शिवाजी, विष्णू, विकी, राकेश, ओम, साईराज, श्रेयस, विनित, राजू, एकनाथ, आशीर्वाद, सागर, प्रज्वल, ईश्वर, प्रशांत सुतार आदि सहभागी झाले होते.