बेळगाव / प्रतिनिधी
कंग्राळी खुर्द येथील एका युवकाला मारहाण केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी शशिकांत रामचंद्र आंबेवाडकर (वय ४५, रा. कंग्राळी खुर्द) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता सुभाषनगर परिसरात ही घटना घडली. त्यावेळी त्यांच्या वडिलांवर सुभाषनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्या ठिकाणी रामकृष्ण रामचंद्र आंबेवाडकर (रा. बेळगाव) आणि नारायण लक्ष्मण आंबेवाडकर (रा. गडहिंग्लज) या दोघांनी शशिकांत यांच्यावर हल्ला करून मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.या घटनेसंदर्भात १६ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला असून, मार्केट पोलिस स्थानकाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.