- श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगांव यांच्यावतीने आयोजन
बेळगाव : कऺग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथे उद्या रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १० वाजता मोफत चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर होणार आहे. श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगांव यांच्यावतीने, यशोधन ज्योतीनगर व रामदेव गल्ली कॉर्नर कंग्राळी खुर्द याठिकाणी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी स्थानिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.