बेळगाव / प्रतिनिधी
कंग्राळी बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी बोलताना सी. टी. रवी यांनी इतिहासाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, जर छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी राजे नसते, तर आज आपली हिंदू ओळख टिकून राहिली नसती. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आम्ही आमच्यातील मतभेद बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे. “आमची भाषा वेगवेगळी असली तरी आमची संस्कृती हिंदू ही एकच आहे असे मत त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाला भाजप बेळगावचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख हिरामणी मुचंडी, तसेच ॲड. सुधीर चव्हाण आदींनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य व भाजप नेते प्रदीप पाटील, यलोजी पाटील, ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच मोठ्या संख्येने वडील मंडळी, महिलावर्ग, युवक आणि बालचमू उपस्थित होते.








