बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची दंत तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मराठा मंडळ डेंटल कॉलेजचे डॉ. आनंद हिरेमठ आणि त्यांच्या समवेत दहा प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स उपस्थित होते. हे दोन दिवसांचे शिबीर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे महत्व पटवून दिले.
October 20, 2025
सहा जणांना अटक : हेरॉईनसह रोकड आणि मोबाईल जप्त बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरातील कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये अंमली पदार्थ विक्री […]