बेळगाव / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल येथे विशेष कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख योग प्रशिक्षक म्हणून डॉ. सौरभ पाटील आणि विनायक पाटील उपस्थित होते . त्यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनाचे वेगवेगळे प्रकार करवून घेतले आणि त्याचे महत्व सांगीतले. प्राचार्या आर. आर. जोशी आणि प्राचार्य अरुण जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने योग जागृती फेरी देखील काढण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थीवर्ग उपास्थित होते.