बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव प्रादेशिक आयुक्तपदी जानकी के. एम. यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टनावर यांची बंगळूर येथे बदली झाली होती. तरी त्यांच्याकडेच प्रादेशिकपदाचा अतिरिक्त पदभार दिला होता. आता कायमस्वरूपी प्रादेशिक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार २०१२ च्या बॅचमधील आयएएस अधिकारी जानकी के. एम. यांची प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.