बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने यंदा भव्य प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. त्या मंडपाची मुहूर्तमेढ आज सकाळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी परंपरा दास, नागेंद्र दास, नीताई निमाई दास, राम दास, ब्रजजन दास व इतर अनेक भक्त उपस्थित होते. जन्माष्टमी भव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी भक्तगण कामाला लागले आहेत.
October 18, 2025
बेळगाव : माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय..सौ. शकुंतला अनिल […]