बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त गुरुवार दि. ३ एप्रिल पासून रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त मुंबईचे श्री विश्वरूप प्रभुजी यांचे रामनवमी बाबत कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी विश्वरूप प्रभुजी यानी प्रभू श्रीराम यांच्या जन्माबाबतची कथा सांगितली.
रविवार दि. ६ एप्रिलला दुपारी ११ पासून कार्यक्रमास सुरूवात होणार आहे. दुपारी १२ वाजता अभिषेक , कीर्तन, प्रवचन व नंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.
December 11, 2025
स्मार्ट टीव्ही व तिजोरीचे उद्घाटन येळ्ळूर : येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेत नूतन एसडीएमसी अध्यक्षा म्हणून सौ. दिव्या कुंडेकर यांची निवड करण्यात आली. याआधी २०२३-२६ या […]








