बेळगाव / प्रतिनिधी
इंडियन कराटे क्लब बेळगांव ॲकॅडमीच्या तहसीलदार गल्ली श्री सोमनाथ मंदिर शाखा आणि छ. श्री शिवाजी महाराज चौक, मण्णूर बेळगाव शाखा या शाखांच्या कराटेपटूंनी लक्ष्मीईश्वर, गदग येथील साईन स्पोर्ट्स कराटे ॲकॅडमीतर्फे आयोजित लक्ष्मीईश्वर कराटे स्पर्धेत १६ सुवर्ण पदकांसह एकूण २७ पदके जिंकत घवघवीत यश मिळविले आहे.
इंडियन कराटे क्लब बेळगांव ॲकॅडमीच्या तहसीलदार गल्ली श्री सोमनाथ मंदिर शाखा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मण्णूर, बेळगाव शाखा या शाखांच्या कराटेपटूंनी उपरोक्त स्पर्धेतील कुमिते आणि काता या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करीत २७ पदकांची लयलूट केली. या पदकांमध्ये १६ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्व विजेत्यांना बक्षीसादाखल प्रमाणपत्र, ट्रॉफी, मेडल आणि ट्रॅकसूट वितरित केले गेले. सर्व यशस्वी कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र बी. काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.