- डॉ. प्रभाकर कोरे यांची उपस्थिती : कंपनीकडून दर्जेदार साहित्यनिर्मिती
बेळगाव / प्रतिनिधी
फेदरलाईट या फर्निचरच्या शोरुमचे उद्घाटन मंगळवारी मोठ्या थाटात करण्यात आले. उद्यमबाग येथील बेळगाव-खानापूर रोडनजीक अक्षय एम्पायरच्या पहिल्या मजल्यावर तब्बल तीन हजार चौरस फूट जागेत भव्य शोरुम सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, उद्योजक राम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. प्रभाकर कोरे यांनी शोरुमची पाहणी करून एम. डी. अश्विन चव्हाण, संचालक संतोष मुख्या व बिझनेस हेड ज्ञानेंद्रसिंग परिहार यांचे अभिनंदन केले. फेदरलाईट कंपनीसोबत केएलईचे पूर्वीपासूनच जिव्हाळ्याचे संबंध असून यापुढेही त्यांनी गुणवत्तापूर्ण काम करावे, अशा शुभेच्छा डॉ. कोरे यांनी दिल्या.
फेदरलाईट कंपनीविषयी सांगताना ज्ञानेंद्रसिंग परिहार म्हणाले, ऑफीस, हॉस्पिटल यामध्ये वापरले जाणारेचांगल्या दर्जाचे फर्निचर फेदरलाईट कंपनी तयार करते. बेंगळूर व चन्नई या दोन ठिकाणी कंपनीच्या साहित्याचे उत्पादन केले जाते. ऑफीस फर्निचरमध्ये गोदरेजनंतर सर्वाधिक खप फेदरलाईट कंपनीचा आहे. विशेषतः क्लासरूम, हॉस्टेल, हॉस्पिटल, विविध कार्यालये, सरकारी कार्यालये यासाठी मॉड्युलर तसेच फर्निचर स्टील व लाकडामध्ये तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हुबळीनंतर आता बेळगावमध्ये फेदरलाईट शोरूम सुरू होत आहे. दर्जेदार साहित्यामुळे कंपनीचे नाव प्रसिद्ध असून आता बेळगावच्या ग्राहकांना हुबळीपर्यंत ये-जा करावी लागणार नाही. सोफासेट, खुर्ची, कपाटे, टेबल्स यासह इतर वस्तु कंपनीने तयार केल्या असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संचालक रजत चव्हाण, उद्योजक पराग भंडारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.