• हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतली पोलिस विभागाची बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावात दि. ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी गृहमंत्री जी. परमेश्वर आज बेळगावमध्ये दाखल झाले. बेळगाव पोलिस विभागाने गृहमंत्र्यांचे स्वागत गार्ड ऑफ ऑनर देऊन केले. यानंतर, गृहमंत्री यांनी बेळगावसह बागलकोट, विजयपुर, गदग, धारवाड आणि हुबळी उत्तर विभागातील पोलिस अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत हिवाळी अधिवेशनात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच संभाव्य सुरक्षा आणि खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.

बैठकीला एडीजीपी हितेंद्र, आयजीपी चेतनसिंग राठौर, हुबळी –धारवाडचे आयुक्त एन. शशिकुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.