• तब्बल तीन तास मृतदेह लोंबकळतच 

यरगट्टी : ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या हेस्कॉम कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. यरगट्टी तालुक्यातील मुगळीहाळ गावात ही धक्कादायक घटना घडली. बगरनाळ गावातील मारुती आवळी (वय २५) असे त्या मृत हेस्कॉम कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सदर हेस्कॉम कर्मचारी मुगळीहाळ गावात विजेच्या खांबावर चढून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम करत असताना त्याला विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. खेदाची बाब म्हणजे तब्बल तीन तासाहून अधिक वेळ लटकत असलेल्या मृतदेहाजवळ हेस्कॉमचे अधिकारी, कर्मचारी कोणीही फिरकले नाहीत. या निष्काळजीपणामुळे मुगळीहाळ ग्रामस्थ हेस्कॉम अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.