बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरी उपविभाग ३ मध्ये सोमवारी वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली. सहायक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर सविस्तर तोडगा काढण्यात आला.

बैठकीचे आयोजन शहरी उपविभाग ३ च्या कार्यालयात सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले. या बैठकीला शहर सेवक दिनेश नशीपुडी, निवृत्त न्यायाधीश ओडियर, माजी नगरसेवक रसुल मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्राहकांनी प्रामुख्याने वीज मीटरमधील त्रुटी, बिलाच्या समस्या आणि सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारी मांडल्या. तसेच ॲड. पाटील यांनी सह्याद्री नगर टॉवर संदर्भातील मुद्द्यावर चर्चा केली.

बैठकीत उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनी आणि कनिष्ठ अभियंत्यांनी ग्राहकांच्या प्रश्नांची तांत्रिक उत्तरे दिली. अनेक समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या, तसेच अश्विन शिंदे यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सायबर फसवणूकबाबत आलेल्या तक्रारींचीही बैठकीत गांभीर्याने दखल घेतली गेली.

व्यावसायिक भंडारी, ॲड. चव्हाण आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर इस्माईल बाबू यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.