- चंदगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
चंदगड / लक्ष्मण यादव
चंदगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, अथर्व दौलत साखर कारखान्याचे विश्वस्त मा. श्री. गोपाळराव पाटील, दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा. श्री.अशोक पाटील, हलकर्णी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा. श्री. संजय पाटील, तसेच मा. श्री. विशाल पाटील, मा. श्री. गोविंदराव पाटील आणि मा. श्री. शरद मटकर यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मा. श्री. नामदेव पाटील, मा. श्री. रवींद्र बंदिवडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या जाहीर प्रवेशामुळे चंदगड तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.








