सावगांव : येथील गायत्री गायत्री विविधोदेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक २.३० वा. ओम मंगल कार्यालय, बेनकनहळळी, सावगांव रोड येथे बोलविण्यात आली आहे.
- सभेपुढील विषय :
- मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे
- सन २०२४ – २०२५ सालचा अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रकास मंजुरी देणे
- सन २०२५ – २०२६ सालच्या अंदाजपत्रकास मंजूर करणे
- सन २०२५ – २०२६ सालच्या ऑडिट साठी शासनबद्ध ऑडीटर नेमणे
- थकबाकी कर्जदारांच्या वसुली संदर्भात चर्चा करणे
- मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे
अशा विविध विषयांवर सभेत चर्चा होणार आहे. फक्त शेअर्स सभासदांना सभेला हजर राहण्याची परवानगी आहे. सभेला हजर राहताना नोटीस प्रत सोबत घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती चेअरमन उमेश बहिर्जी चोपडे यांनी केली आहे.