बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचारित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत विविध प्रकल्पांना भेट दिली. कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाने यासाठी उपक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये महाद्वार रोड येथील यश हॉस्पिटलमध्ये रुग्णांशी संवाद साधण्यात आला. तसेच आधार पब्लिक स्कूल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी डॉ. अस्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.








