• जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस  

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भोजनालयात २२ प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाली आहे. रविवारी रात्रीच्या भोजनानंतर प्रशिक्षण शाळेतील २२ प्रशिक्षणार्थींची प्रकृती बिघडली.विषारी अन्न खाल्ल्याने त्यांना खानापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून ९ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण घेण्यासाठी शहरातील कर्नाटक राज्य पोलिस प्रशिक्षण शाळेत आलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी, रविवारी रात्री अन्न खाल्लेल्या २२ प्रशिक्षणार्थींना उलट्या, ताप आणि थकवा जाणवू लागला आणि त्यांना सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे असे सांगण्यात आले.