बेळगाव / प्रतिनिधी

फोर्ट रोड येथील एका ऑटोमोबाईल दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. भर पावसात सुद्धा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकानाच्या आतील भागातून धुराचे लोट येऊ लागले. हे पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत शॉर्टसर्किटमुळे फटाक्याप्रमाणे आवाज येऊन जोरदार ठिणग्या उडत होत्या. त्यांच्या आवाजामुळे नागरिकात घबराट निर्माण झाली होती. मार्केट पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.