• टिळकवाडी पोलिसांची कारवाई
  • एनडीपीएस कायद्यांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल

बेळगाव / प्रतिनिधी

अनगोळ परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन युवकांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर तिघांनीही मादक पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

जावीद उर्फ बेंडिगेरी (वय २९ रा. कुरुबर गल्ली अनगोळ), महम्मद कैफ अजाज शेख (वय २४ रा. आझादनगर), महम्मद गुलमर सादिक शरीफ (वय ३२ रा. धामणे, मशीद गल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राथमिक तपासात तिघेही अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर स्वतंत्र तीन गुन्ह्यांची नोंद केली आहे. या कारवाईत टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम एस. पूजेरी आणि त्यांच्या पथकाने दक्षता दाखवल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी त्यांचे कौतुक केले आहे.