बेळगाव : कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील डॉ. श्रुती श्रीकांत पाटील यांनी २०२० साली झालेल्या पीएसआय परीक्षेसाठी अर्ज केला होता. धारवाड येथे त्यांनी ही परीक्षा दिली. २०२१ साली शारीरिक परीक्षा झाली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने नुकतीच त्यांची कर्नाटक पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. याबद्दल श्री. रमाकांत कोंडुसकर यांनी श्रीराम सेना हिंदुस्थान आणि समस्त मराठा समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार केला. तसेच मराठा समाजातील मुलांना चांगल्या उच्च पदापर्यंत जाता यावे यासाठी मुलांना मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती केली.
याप्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर, कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील व विनायक कम्मार, भूषण तमानाचे, विकास चव्हाण, बाबू पाटील, स्वप्नील देवरमणी, विनायक बिरजे आणि राजेंद्र बैलूर उपस्थित होते.