बेळगाव / प्रतिनिधी
राजकुमार शंकरराव मोरे मित्रपरिवार मंडळातर्फे उद्याच्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चाला येणाऱ्या नागरिकांसाठी 1000 टोपी व पावसासाठी रेनकोट वाटप करण्यात येणार आहे. रमेश पावले यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रामुख्याने येणाऱ्या महिलांसाठी रेनकोट वाटप केलं जाईल. यावेळी विकास कलघटगी ,अंकुश केसरकर, प्राचार्य आनंद आपटेकर, शिवराज सावंत, लक्ष्मण किल्लेकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.