बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या ‘महसूल विभागात’ नागरिकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेशमा तालीकोटी यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर तपासणी करून कारवाईसाठी महापौरांसह भाजप नगरसेवकांनी छेडले. यापूर्वी आंदोलन मनपा सभागृहाच्या बैठकीत याच मुद्द्यावर शासनाला पत्र पाठवण्याचा ठराव महापौर मंगेश पवार यांनी संमत केला होता. या मागणीसाठी नगरसेवक आक्रमक झाले होते. गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात बोलावलेल्या साधारण सभेत महापौर मंगेश पवार यांनी सर्व सदस्यांच्या निर्णयानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध १५ दिवसांत निवृत्त न्यायाधीशांमार्फत तपासणी संदर्भात शासनाला पत्र पाठविण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र याबद्दल अधिकारी वर्गाने उदासीनता दाखवली असल्याने आता सत्ताधारी असलेल्या वर्गाने आंदोलन छेडले आहे.