• अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती

बेळगाव : ‘क्रेडाई बेळगावच्या ‘बेल्कॉन २०२६’ या भव्य बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा. सीपीएड मैदानावर होणार आहे. कर्नाटक राज्यात बेंगळूरु नंतर बेळगाव शहरात प्रथमच अलिशान वातानुकूलित भव्य शामियानात संपन्न होत असलेल्या या प्रदर्शनाची बेळगावकरांना मोठी उत्सुकता लागली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे.यावेळी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष भास्कर टी. नागेंद्रप्पा उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.