बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. भाजपच्यावतीने या सेव राजीनाम्याची मागणी करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच जिल्हा पंचायत कार्यालयाला घेराव घालण्यात आला. राणी चन्नम्मा सर्कल येथून निघालेल्या मोर्चादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली यावेळी महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, संकल्प शेट्टर, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, मल्लिकार्जुन मादमनवर, धनश्री देसाई, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सोनाली सरनोबत, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, विनय कदम, सचिन कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष देशनुर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महांतेश चिन्नाप्पा गौडर, सोशल मीडिया सहसंयोजक मनोज पाटील, धनंजय जाधव, प्रशांत अम्मीनभावी, श्रीकर कुलकर्णी, बसवराज सनिकोप्पा, ज्योती शेट्टी, श्वेता जगदाळे व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.