बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरालगतच्या निलजी गावात सुमारे १ कोटी रुपयांच्या खर्चाने श्री ब्रह्मलिंग मंदिर परिसरात समुदाय भवन उभारले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते या भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी त्या म्हणाल्या, “ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी हे सामुदायिक भवन उभारले जात आहे. संपूर्ण मतदारसंघात मंदिरे, सामुदायिक भवनं, शाळांच्या खोल्या, अंगणवाडी इमारती अशा विविध विकासकामांना गती दिली आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेचा विश्वास जपण्यासाठी सातत्याने ही कामे केली जात आहेत.”

या कार्यक्रमाला शिवानंद गुरुजी, शंकरगौडा पाटील, नागेश देसाई, सतीश दानुटकर, मनोहर बंदगी, मनोहर बेळगावकर, सुरेश पाटील, निंगाप्पा मोदगेकर, गोविंद पाटील, उमेश मोदगेकर, विनायक मोडगेकर, दीपक काटकर, चंदू, रवी, रंगना गोमनाची यांच्यासह ग्रामपंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.