बेळगाव : चलवेनहट्टी येथे दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महाप्रसाद आयोजित करण्यात येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी ही श्री ब्रम्हलिंग मंदिरामध्ये सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी महाप्रसाद (परव) आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी अभिषेक घालून पूजा – अर्चा केल्यानंतर मंदिर देवदर्शनासाठी भाविकांना खुले केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वा. महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.तरी समस्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य व ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
March 10, 2026
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धगधगती शौर्यगाथा दर्शविणारे प्रा.वसंत कानेटकर लिखित शिवगणेश प्रोडक्शन निर्मित “इथे ओशाळला मृत्यू” या ऐतिहासिक नाटकाचे दोन प्रयोग महाराष्ट्र एकीकरण […]








