बेळगाव : चलवेनहट्टी येथे दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महाप्रसाद आयोजित करण्यात येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी ही श्री ब्रम्हलिंग मंदिरामध्ये सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी महाप्रसाद (परव) आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी अभिषेक घालून पूजा – अर्चा केल्यानंतर मंदिर देवदर्शनासाठी भाविकांना खुले केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वा. महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.तरी समस्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य व ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
December 10, 2025
सुदैवाने जीवितहानी टळली बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत वाहनाला अपघात झाला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या कारला कॉंक्रिट मशीन वाहतूक करणाऱ्या वाहनाने […]








