• बेळगाव कॉलेज रोडवरील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

गोवा पासिंगच्या एका कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली, या घटनेत सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. बेळगाव शहरातील कॉलेज रोडवर त्यागवीर शिरसंगी लिंगराज अरस कॉलेज रोड हॉस्पिटलसमोर काल मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोवा पासिंगची इनोव्हा कार भरधाव वेगाने आली आणि तिने हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या गाड्यांना धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने आणि पार्क केलेल्या गाड्यांमध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात तिन्ही कार आणि दुचाकी पूर्णपणे खराब झाल्या आहेत.

बेळगावातील कॉलेज रोडवर घडलेल्या या अपघातामुळे रात्रीच्या वेळीही वाहनचालकांनी सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.