बेळगाव : मुलींमध्ये मासिक पाळीविषयी योग्य माहिती आणि जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने कँटोन्मेंट शाळा, कॅम्प, बेळगाव येथे मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा रोटे. अॅड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि रोटे. प्रा. उदयसिंह राजपूत यांनी केले. सचिव रोटे. कावेरी करूर व रोटे.नंदन बागी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजक रोटे.अश्वगंधा कुगजी व रोटे. नीता बिडीकर होत्या.
मुख्य वक्त्या रोटे. डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी मुलींना मासिक पाळीविषयी स्वच्छता, गैरसमज व योग्य माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.कँटोन्मेंट शाळेचे चेअरमन, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी रोटे. सविता वेसणे, रोटे. सुरेखा मुम्मिगट्टी, रोटे. अशोक बादामी, रोटे. रूपा देशपांडे आणि अॅन. अनुपा राजपूत उपस्थित होते.