बिजगर्णी : येथील हायस्कूल मधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते नुकताच एका कार्यक्रमात सायकली‌‌ वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी यावेळी स्वागत गीत सादर केले. संस्था सचिव ए. एल. निलजकर यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस. एम. जाधव उपस्थित होते. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन गेल्या वर्षभरात शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. भौतिक सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्था पदाधिकारी कटिबद्ध आहोत असे मनोगत व्यक्त केले.

दरवर्षी गावचे सुपुत्र योगेश निलजकर अमेरिका, यांनी दिलेल्या सायकली विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आले. योगेश निलजकर यांनी शाळेत लाईटची सोय, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, स्कॅनर, गणवेश वाटप हे विधायक प्रेरणादायी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम हाती घेतले आहेत हे कार्य आदर्शवत आहे.

यावेळी प्रमुख अतिथी अशोक येटले (वेंगुर्ले), रुपेश किल्लेकर (गणेशपूर) यांच्या उपस्थितीत सायकली वाटप करण्यात आले. याप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले यांनी मार्गदर्शन करुन शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्या बद्दल शिक्षकांचं विशेष कौतुक केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांनी स्वखर्चाने शाळेच्या इमारतीचे रंगकाम केले तसेच महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे वाॅटर फिल्टर दिल्याबद्दल वाय. पी. नाईक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह प्रदान करुन ऋण व्यक्त केले.

गावातील व कावळेवाडीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने आठवीच्या वर्गात प्रवेश घेतल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गेल्या चाळीस वर्षात संस्थेचा शैक्षणिक आलेख उंचावत आहे.हजोरो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन चांगल्या पदावर कार्यरत आहेत हे सर्व पालकांच्या सहकार्याने शक्य झाले भविष्यातही सर्वांच्या मदतीने शाळा अधिक शैक्षणिक गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्य करुया असा आशावाद निलजकर यांनी व्यक्त केला.

यावेळी यल्लापा बेळगावकर, पुंडलिक जाधव, अशोक कांबळे, के. आर. भास्कर, मनोहर पाटील, पांडुरंग मोरे मोणापा मोरे, कल्लापा अष्टेकर, कृष्णा भास्कर, निंगापा पाटील, परशराम भास्कर, शिवाजी तारिहाळकर तसेच शिक्षक अरुण दरेकर,दीपा बेळगावकर, विजया शिंदे, सौ. सुलभा भास्कर, आर. पी. सरवणकर आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश कांबळे यांनी आभार वाय. एच. पाटील यांनी मानले. यावेळी पालक – विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.