बेळगाव : बिजगर्णी माणसाचे शेवटचे विश्रांतीस्थान मानली जाणारी स्मशानभूमी अनेकदा दुर्लक्षित राहते. मात्र बिजगर्णी गावातील तरुणांनी सामाजिक जाणीवेतून पुढाकार घेत, गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. पावसाळ्यात स्मशानभूमीत गवत, झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शवविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याशिवाय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ब्रम्हलिंग युवक मंडळ, तिरंगा युवक मंडळ, श्री गणेश भांडी संघ आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
तरुणांनी झाडू, खोरे, फावडे, खुरपे आदी साहित्य हातात घेऊन परिसरातील गवत व कचरा हटवला. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकीतून राबवलेली ही मोहीम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. या उपक्रमात ग्रामस्थ, युवक, मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावाच्या विकासात अशा उपक्रमांचा मोलाचा वाटा असतो आणि गावपण जपले जाते, हे या उदाहरणातून दिसून आले.
मनोहर बेळगावकर, निंगाप्पा जाधव, बबन जाधव , संतोष कांबळे, मनोहर पाटील, परशरम जाधव, रमेश भाषकलं, सागर नाईक, यल्लाप्पा तारिहाळकर, रामचंद्र मोरे, परशरम जाधव, अप्पाजी निलजकार, सुनील बचिकार, मोहन सावी, दयानंद बिर्जे, राजू राजु जाधव, परशरम निलजकर, आपा निलजकार, गोपाळ बेळगावकर, अशोक तारिहलाकार, भाऊ जाधव , विनोद खांडेकर, चेतन अष्टेकर, सागर जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.