• सावगांव, बेनकनहळ्ळी परिसरात राबवला उपक्रम

बेनकनहळ्ळी : ‘ झाडे लावा,झाडे जगवा’ ही फक्त घोषणा न देता ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि. ६ ऑगस्ट रोजी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत, शाळा सुधारणा समिती व शिक्षकांनी संयुक्तरित्या ६०० झाडांची लागवड केली.

ग्रामपंचायत हद्दीतील गणेशपुर ,सरस्वतीनगर, अंगडी कॉलेज व सावगाव परिसरामध्ये हा उप्रकम राबवण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष डॉ.वाय एम.पाटील ,शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष कलाप्पा पाटील, मुख्याध्यापक ईश्वर पाटील ,वनविभागाचे अधिकारी भीमाप्पा, शिक्षक, सेवकवर्ग, विद्यार्थी लक्ष्मीबाई कांबळे व इतर सर्वांनी मिळून ग्रामस्थांनी मिळून वृक्षारोपणात सहभागी घेतला. यापूर्वीही दरवर्षी बाराशे झाडे लावण्याचा स्तुत्य उपक्रम या ग्रामपंचायतकडून करण्यात आला आहे. आत्तापर्यंत ३५०० वृक्षांचे रोपण केले आहे.