
- बेळगावच्या राजाचा पाटपूजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
बेळगाव : गणेशभक्तांच्या मनात उत्सवाची चाहूल लागली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीला विविध भागात गणेशाची मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारला ऑर्डर देण्यात येत आहे , आज गुरुवारी गणेश जयंती निमित्ताने बेळगावचा राजा प्रसिद्ध ‘ चव्हाट गल्लीतील’ गणपती मंडळाचा पारंपरिक पाठपूजन सोहळा पार झाला. याच संकेताने गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवात होते. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये या सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय.
चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ गणपती हे सीमाभागातील एक अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धास्थान असलेले गणपती स्थान आहे. गेली अनेक वर्षं इथला गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रमांसाठी ओळखला जातो. आजचा पाठपूजन सोहळा हा मंडळाच्या वर्षभराच्या कार्याचा प्रारंभ मानला जातो आणि यानंतरच मूर्ती बनवण्याचे , सजावटीचे व इतर नियोजनाचे काम औपचारिकपणे सुरू होते.
सोहळा आज सायंकाळी सात वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली परिसरात पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थित माजी आमदार अनिल बेनके विश्व हिंदू परिषदचे विजय जाधव, अभी वेरणेकर प्रवीण धामणेकर व मुरगेंद्र पाटील रोहित रावळ, शोल्क कडोलकर, मूर्तिकार रवी लोहार, मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक कालीमिर्ची तसेच मंडळाचे उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनील जाधव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने या पूजनात सहभागी झाले होते. पाठपूजनानंतर महाप्रसादचा लाभ सहा हजार भक्तांनी घेतला ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत गणेशभक्तांनी जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला.








