बेळगाव : चव्हाट गल्लीतील क्रांती सिंह नाना पाटील चौक येथे सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रविवार दि. २७ जुलै रोजी बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मंडपाच्या खांबाचे पूजन करून मुहुर्तमेढ करण्यात आली.
प्रारंभी गल्लीतील सर्व देवतांची विधीवत पूजा करून आरती करण्यात आली. तसेच येणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता सर्व देवतांना गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष व गल्लीतील पंच मंडळींच्याहस्ते मंडपाच्या खांबाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व गणेशभक्त गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
