बेळगाव / प्रतिनिधी

वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या वतीने आठवड्याला एकदा वीकेंड स्पेशल बेळगाव ते हिडकल डॅम , गोडचिनमलकी आणि गोकाक फॉल्स अशी बससेवा सुरू केली आहे. दि. ६ जुलै पासून या विशेष बस सेवेचा प्रारंभ होणार आहे. बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकापासून सकाळी ९ वाजता ही बस सुटणार असून सायंकाळी ७ वाजता परत येणार आहे. ५० प्रवाशांच्या आसन क्षमतेची बस असून यासाठी प्रत्येकी २१० रुपये तिकीट दर असणार आहे.