- कोणतीही कमतरता नाही
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत चालू असून कोणतीही कमतरता नाही, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, सोशल मीडियावर पेट्रोलच्या तुटवड्याबाबत अफवा पसरल्याने काही वेळा लोक पेट्रोल पंपासमोर रांगेत उभे राहत होते, परंतु सध्याची परिस्थिती सामान्य आहे. सिलेंडर गॅसचा पुरवठा अजूनही पुरेसा आहे.
इंधन पुरवठादार कंपन्या आणि पेट्रोल पंप मालकांशी आधीच चर्चा झालेली आहे, त्यामुळे कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी लोक घाबरून इंधनाचा साठा करीत असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. पेट्रोल पंपांवर बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल/डिझेल विकू नये, अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.








