बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ४८ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबईच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक श्री. प्रवीण टाके उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. समीर देशपांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने अधिस्वीकृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पत्रकार भवन, पद्मावती चेंबर्स, कुलकर्णी गल्ली, बेळगांव येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे , असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व कार्यवाह महेश काशीद यांनी केले आहे.