बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचालित बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि सरस्वती पूजन कार्यक्रमाने करण्यात आली. संस्थेचे चेअरमन डॉ. डी.टी. बामणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रा. दीपक हरदगट्टी यांनी शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम पाटील यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी उदय पाटील, शिवराज कुलकर्णी, बी. यशवंत, श्रद्धा पाटील, समीना अत्तार, तेजश्री पुजारी आणि स्नेहा लाड यांनी परिश्रम घेतले. सोनाली पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी नूतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.








