बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींच्या गीताने झाली. शाळेचे संयोजक शंकर चौगुले सर, प्रमुख अतिथी निता यल्लारी यांच्याहस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्प देऊन गुरु प्रति आपले मत व्यक्त केले. सृष्टी पाटील या विद्यार्थिनीने आपले विचार व्यक्त केले.प्रमुख अतिथी नीता यल्लारी यांनी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असलेले गुरु शिष्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर संयोजक शंकर चौगुले सर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, प्राथमिक विभाग समन्वयक भाग्यश्री कदम, माध्यमिक विभाग समन्वयक धनश्री सांगावकर, ज्येष्ठ शिक्षक सुनील जाधव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चौगुले या विद्यार्थिनींने केले तर आभार श्रावणी उघाडे या विद्यार्थिनीने मानले.